जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी



अकोला,दि.19(जिमाका)-: देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. येथील लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमात  सहायक अधिक्षक अतुल सोनवणे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रवींद्र कुमार तेलंग, वंदना निर्मळ यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  इंदिरा गांधी यांची जयंती ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ म्हणून पाळण्यात येते. यावेळी सहायक अधिक्षक अतुल सोनवणे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ