कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘दोन’ पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज

  अकोला दि.5(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 94 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन जणांचाअहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 2 व खाजगी 0)2+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 2.

आरटीपीसीआर ‘दोन’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे. दोघेही रुग्ण मुर्तिजापूर येथून संदर्भित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

दोघांना डिस्चार्ज

आज दिवसभरात दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘आठ’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65988(49855+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात आठ सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील दोन रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर सहा जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना