कोविडःआरटीपीसीआर चाचण्यात ‘17’ पॉझिटिव्ह; पाच डिस्चार्ज


अकोला दि.26(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 47 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 17 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर पाच रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 17 व खाजगी 0)17+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 17.

आरटीपीसीआर ‘17’ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात 17 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात सहा पुरुष व 11 महिलांचा समावेश असून हे रुग्ण पातूर व अकोला मनपा क्षेत्रातील प्रत्येकी सहा, बाळापूर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन तर तेल्हारा येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

पाच डिस्चार्ज

आज दिवसभरात पाच रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘42’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66067(49934+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 42  सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

00000

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ