बोरगाव मंजू येथे मंगळवारी(दि.८)कायदेविषयक जनजागृती महाशिबीर

 अकोला,दि.४(जिमाका)-: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार मंगळवार दि.८ रोजी बोरगाव मंजू येथे ‘कायदेविषयक जनजागृती  कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण आणि ‘हक हमारा भी तो है’ या मोहिमेअंतर्गत कायदेविषयक जनजागृतीसाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा के. केवले या अध्यक्षस्थानी उपस्थित असतील तर जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या महाशिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, अकोला बार असो. चे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा