ई-रजिस्ट्रेशन प्रणालीस प्रारंभ


अकोला,दि.22(जिमाका)- गहाणखत व भाडेकरार या दस्ता प्रमाणेच ‘अग्रीमेंट टु सेल’ दस्त इ. ई-रजिस्ट्रेशन प्रणालीव्दारे ऑनलाईन नोंदणीकृत करण्याची सुविधा अकोला शहरात सुरू झाली आहे. या सुविधेमुळे बांधकाम व्यावसायिकांना लाभ होणार आहे.  या प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागाचे सह दुय्यम निबंधक निलेश वि.शेंडे यांनी केले आहे.

ई-रजिस्ट्रेशन प्रणाली सुविधा मुंबई, पुणे, ठाणे पाठोपाठ विदर्भातील अकोला येथे सुरू झाली आहे. ज्या बांधकाम व्यावसायीकांकडे 20 किंवा त्यापेक्षा जास्त युनिटची स्कीम आहे त्यांना ई- रजिस्ट्रेशन प्रणालीचा उपयोग घेता येणार आहे. या प्रणालीची सुरुवात मंगळवारी(दि.21) कोठारी कंस्ट्रक्शन कंपनी आणि विश्रेश गजानन भागवतकर यांचे मध्ये झालेल्या ‘अग्रीमेंट टु सेल’ हा दस्त नोंदणीकृत करुन झाला. या प्रणालीमुळे कार्यालयातील गर्दी कमी होऊन पारदर्शकता व कामाची गती वाढविण्यास मदत होणार आहे. ही प्रणाली सुरु करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी किशोरकुमार मगर यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे सह दुय्यम निबंधक निलेश वि.शेंडे यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ