सेवानिवृत्ती धारकांसाठी पोस्टाची ‘नो टेन्शन फॉर पेन्शन’ अभिनव योजना



अकोला,दि.18(जिमाका)-: शासनाच्या विविध सुविधा आणि सेवानिवृत्‍तीधारकांना घरपोच हयातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी  निवृत्तीवेतन भारतीय डाक विभागाच्यावतीने ‘नो टेन्शन फॉर पेन्शन’ हा अभिनव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

           दरवर्षी डिसेंबरपूर्वी ह्यातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी त्यांना नाहक त्रास होत होता. परंतु आता हे प्रमाणपत्र पोस्टमनकडून घरपोच किंवा पोस्ट कार्यालयातून मिळवण्याची सुविधा डाक विभागाने उपलब्ध करून दिली आहे.नो टेन्शन फॉर पेन्शन’ हे ब्रीदवाक्य घेऊन डाक विभागाच्या वतीने हे प्रमाणपत्र घरपोच पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

                                  पोस्टात किंवा पोस्टमन कडून मिळणार प्रमाणपत्र

ह्यातीचे (लाईफ सर्टीफिकेट) प्रमाणपत्र आता पोस्टातून आणि घरपोच सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे.त्यासाठी डाक विभागाच्या या 0724-2415039 क्रमांकावर संपर्क साधल्यास पोस्टमन ह्यातीचे प्रमाणपत्र पेन्शनधारकांना घरपोच उपलब्ध करून देणार आहे.

                                     कशासाठी लागते ह्यातीचे प्रमाणपत्र?

केंद्र आणि राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक तसेच महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी आदींना पेन्शन मिळविण्यासाठी दरवर्षी डिसेंबरपूर्वी ह्यातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. याशिवाय विविध शासकीय सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुद्धा या प्रमाणपत्राची गरज भासते.

आवश्यक कागदपत्रे काय?

ह्यातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ज्या बँकेतून पेन्शन मिळते त्या बँकेचे नाव, आधार कार्ड क्रमांक आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर या तीन बाबी महत्वाच्या आहेत. या तीन बाबीची पूर्तता केल्यास सबंधित व्यक्तीला घरपोच ह्यातीचे प्रमाणपत्र डाक विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

70 रुपये शुल्क

ह्यातीच्या प्रमाणपत्रासाठी सेवानिवृत्ती धारकांना जीएसटीसह 70 रुपये द्यावे लागतात.परंतु इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे प्रीमीयम अकाऊंटधारकांना यात 50 टक्के सूट देण्यात येत असून हे अकाऊंट असल्यास केवळ 35 रुपये भरून ह्यातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.

                                 घरपोच ह्यातीचे प्रमाणपत्र सुविधेचा लाभ घ्यावा

डाक विभागाच्या वतीने पेन्शन धारकांना घरपोच ह्यातीचे प्रमाणपत्र पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे सेवानिवृत्ती धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ