अकोला जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते ३ डिसेंबरला दिल्लीत होणार सन्मान


अकोला,दि.१(जिमाका)- जिल्ह्यातील दिव्यांगांचे यशस्वी सर्वेक्षण कार्याची दखल घेत अकोला जिल्हा परिषदेला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाचा वर्ष २०२१ चा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या डिसेंबर या जागतिक अंपगदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

              अपंगत्वावर मात करत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या देशातील दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्यकरणाऱ्या संस्थांना दरवर्षी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने  गौरविण्यात येते. विविध श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्कारात अकोला जिल्हा परिषदेला दिव्यांगांच्या सक्षक्तीकरणासाठी योजनांच्या प्रभावी अंमलबजवाणीसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या श्रेणीत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

जिल्ह्यातील दिव्यांगाना शासकीय योजनांचा लाभ मिळणे आता झाले सुकर

                 अकोला जिल्हा परिषदेने आरोग्य विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील दिव्यांगव्यक्तींचे सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना सुकर झाले आहे .

             सांघिक प्रयत्नानेच जिल्ह्यात दिव्यांगांचे यशस्वी सर्वेक्षण-मुख्य कार्यकारी अधिकारी

           अकोला जिल्हा परिषदेला जाहीर झालेला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार ही अभिमानास्पद बाब असून सांघिक भावनेने  केलेल्या कार्यातूनच हे यश प्राप्त झाल्याच्या भावना मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी व्यक्त केल्या आहेत. या यशात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या सातत्यपूर्व मार्गदर्शन आणि सहकार्याचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.  जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता व त्यांची टीम, समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आदिंचा सहभाग लाभले असून हे सांघिक यश असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ