मतदार नोंदणी जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाची सायकल रॅली


अकोला, दि.9(जिमाका):-  मतदार नोंदणी  अभियानाच्या जनजागृतीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय ते संत तुकाराम चौक-मलकापूर मार्गांवरुन जिल्हा प्रशासनाच्या वतीने सायकल रॅलीद्वारे प्रचार केला. या रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून आज सकाळी सात वा. सायकल रॅली सुरु झाली. यामध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी निलेश अपार आदी उपस्थित होते. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु होवून गौरक्षण रोड, मलकापूर, कौलखेडमार्ग जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. या सायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा