बोरगाव मंजू येथे मंगळवारी(दि.8)कायदेविषयक जनजागृती महाशिबीर


अकोला,दि.7(जिमाका)-: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.8 रोजी बोरगाव मंजू येथे ‘कायदेविषयक जनजागृती  कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण आणि ‘हक हमारा भी तो है’ या मोहिमेअंतर्गत कायदेविषयक जनजागृतीसाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

नागपूर उच्च न्यायालयाचे तथा अकोला जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ति अनिल किलोर यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिबीराचे आयोजन होणार आहे. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा के. केवले, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलिस अधिक्षक संदीप घुगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कायदेविषयक जनजागृती महाशिबीरास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर व अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ