कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘पाच’ पॉझिटीव्ह; दोन डिस्चार्ज

  अकोला दि.20(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 57  अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी पाच जणांचा  अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्हर-आरटीपीसीआर(शा.वै.म. 5 व खाजगी 0)5+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 5.

आरटीपीसीआर ‘पाच’ पॉझिटीव्ह

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून सर्व रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

दोन डिस्चार्ज

आज दिवसभरात दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘34

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66041(49908+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 34  सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ