कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘तीन’ पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज
अकोला दि.6(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 55 अहवाल प्राप्त झाले. त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आरटीपीसीआर ‘तीन’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व एका पुरुष रुग्णाचा समावेश असून हे सर्व रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
झाली.
दोघांना
डिस्चार्ज
आज दिवसभरात दोघांना
डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात
आली.
सक्रिय रुग्ण
‘नऊ’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65991(49858+15142+991)आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात नऊ सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील दोन रुग्ण
उपचारासाठी दाखल आहेत तर सात
जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा