पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दिव्यांग उमेदवारांकरीता गुरुवारी(दि.10) होणार 32 पदांसाठी भरती प्रक्रिया


अकोला,3 दि.(जिमाका)-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  गुरुवार दि. 10 रोजी दिव्यांग उमेदवारांकरीता पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यात  32 पदांसाठी दिव्यांगाची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तरी इच्छुक पात्रताधारकांनी  या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार दि. 10 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळात करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात गर्द्रे ऑटोकॉन, अकोला येथे अस्थीव्यंगासाठी डाटा एंन्ट्री कम टेली कॉलर-पात्रता किमान 12 वी व कॉम्पुटर ज्ञान(18 ते 35 वयोमर्यादा) चार पदे, श्री टॉईज, अकोला येथे अस्थीव्यंगासाठी मशीन ऑपरेटर- पात्रता किमान 12वी व  कॉम्पुटर ज्ञान(18 ते 40 वयोमर्यादा) दोन पदे, सांगलीवाला कलेक्शन, अकोला येथे अस्थीव्यंगासाठी डाटा एंन्ट्री आपरेटर व अकॉऊटंट- पात्रता किमान बारावी व कॉम्पुटर ज्ञान(18 ते 35 वयोमर्यादा) प्रत्येकी दोन पदे तर शिपाई पदाकरीता मुकबधीर-पात्रता 10 वी पास/नापास (18 ते 40 वयोमर्यादा) दोन पदे, मे अनिता मोटर्स, अकोला येथे अस्थीव्यंगकरीता कॉम्पूटर ऑपरेटर तीन पदे - पात्रता किमान 12वी, कॉम्पुटर ज्ञान व संभाषण ज्ञान, टेली कॉलरचे दोन पदे- पात्रता किमान 12वी, कॉम्पुटर ज्ञान व संभाषण ज्ञान, सार्थक इंडिया एज्यूकेशन स्ट्रस्ट, अकोला येथे मुकबधीर/अस्थीव्यंगासाठी ऑफिस वर्क/बॅक ऑफिस डेव्हलोपमेंट- पात्रता किमान 10 किंवा 12 वी पाच पदे, अस्थीव्यंग सेल्स एक्झीकेटिव व टेलीकॉलर पदाकरीता पात्रता किमान 10 किवा 12 वीचे (18 ते 35 वयोमर्यादा)  प्रत्येकी चार पदे तर अस्थीव्यंग कॉम्पुटर ऑपरेटर-पात्रता किमान 10 किवा 12 वी (18 ते 35 वयोमर्यादा)  दोन पदे.

 या प्रमाणे 32 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी आपल्या बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849  व भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778  या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना