अमरावती विभाग पदवीधर मतदार संघनिवडणूक; मतदार नोंदणी कार्यक्रमास मुदतवाढ


अकोला,दि.१० (जिमाका)- : भारत निवडणूक आयोगाच्या दि.1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रम दि. 7 नोव्हेंबरपर्यंत होती. या मतदार नोंदणी कार्यक्रमास मुतदवाढ देण्यात आली असून उमेदवारांचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणी करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा सहायक  मतदार नोंदणी अधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.

            कार्यक्रमांतर्गत दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी झाल्यानंतर दि. 23 नोव्हेंबर 2022 ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून या कालावधीत सुद्धा पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी करता येईल. दि. 30 डिसेंबर 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही,निरंतर मतदार नोंदणी (Continuous Updation)निवडणूकीसाठी उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणी करता येईल.तसेच, मतदारांनी आपले नाव ऑनलाईन पद्धतीने https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate/ या संकेतस्थळावर तर ऑफलाईन पद्धतीने सहायक मतदारनोंदणी अधिकारी यांच्याकडे मतदार नोंदणी करावी, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

                                                                        0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ