‘चला जाणू या नदीला’ संवाद यात्रेतून घडणार जनजागृती ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा




अकोला,दि.१०(जिमाका)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  ‘चला जाणू या नदीला’ ही संवाद यात्रा राबवून त्याद्वारे नदीचे महत्त्व व निगडीत पर्यावरण विषयक जनजागृती होण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा पहिला टप्पा म्हणून नदी परिक्रमा करुन नदीची ओळख होईल. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली.

 

       या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, आ. रणधीर सावरकर, उपवनसंरक्षक अर्जूना के.आर. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,  जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता योगेश दाभाडे, जलबिरादरीचे अरविंद नळकांडे, प्रमोद सरदार आदी उपस्थित होते. या अभियानात अकोला जिल्ह्यातील  पिंजरडा व चंद्रभागा या दोन नद्यांची परिक्रमा जलबिरादरीचे समन्वयक हे करणार आहेत. पिंजरडा नदी या नदीचा वाई लोहारा ता. कारंजा लाड जि. वाशीम या उगमस्थानापासून  ते पारडी ता. बाळापूर येथील संगमस्थानापर्यंत तर चंद्रभागा नदीचा चिखलदरा जि. अमरावती येथील उगमस्थान ते  सांगवामेळ ता. मुर्तिजापूर येथील  संगमस्थानापर्यंत परिक्रमा होईल. या दरम्यान, जनसामान्यांना नदी साक्षर करणे, नदीचा तट, तेथील जैव विविधता, जलसंधारण उपचार, भूजल स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणे, मातीचे क्षरण, प्रदूषण इ. बाबत माहिती दिली जाणार आहे. हा उपक्रम राज्यातील ७५ नद्यांवर राबविला जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात या नद्यांची परिक्रमा करुन जनजागृती व त्यानंतर जलबिरादरी मार्फत शिफारसी केल्या जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली            

                                                        ००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ