कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘नऊ’ पॉझिटीव्ह; एक डिस्चार्ज

 अकोला दि.16(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 80  अहवाल प्राप्त झाला. त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्हर-आरटीपीसीआर(शा.वै.म. 9 व खाजगी 0)9+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 9.

आरटीपीसीआर ‘नऊ’ पॉझिटीव्ह

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष व सात महिलांचा समावेश असून हे रुग्ण पातूर, अकोट व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक तर उर्वरित सहा  रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

एक डिस्चार्ज

आज दिवसभरात एकाला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘30’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66032(49899+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 30  सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ