ग्रामपंचायत निवडणूकः आचारसंहितेची काटेकोर ; अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


 

    अकोला,दि.१०(जिमाका)-  जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने                        निवडणूक  आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणूक आचारसंहिता कालावधीत निवडणूक आचारसंहितेची काटेकोर  अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेसंदर्भात सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार, गटविकास अधिकारी यांची संयुक्त बैठक नियोजन भवनात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे,  उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, अभयसिंह मोहिते , डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार आदी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. त्यांनी आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन केले. जाहीर कार्यक्रम, सभा यांच्यासाठी  पूर्वपरवानगी आवश्यक  आहे. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी  प्रत्येक तालुकानिहाय पथके तयार करावीत. प्रत्येक तालुक्यात ग्रामपातळीवरील यंत्रणेची बैठक घेऊन माहिती द्यावी. सर्व यंत्रणांनी  परस्पर समन्वय राखून निवडणूक आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

                                                      ०००००

 



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ