जि.प.पं.स. निवडणूक; विषय समिती सभापती पदाचा निकाल शनिवारी(दि.5) घोषीत होणार

 

अकोला,दि.2(जिमाका)-  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विषय समिती सभापती पदाचा निकाल रोखून ठेवण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार स्थगीत रिट पिटीशन निकाली काढण्यात आली असून जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाच्या निवडीचा निकाल शनिवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात घोषीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. याकरीता अध्यासी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, अकोला हे विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणूक निकाल घोषीत करतील, असे आदेशाव्दारे स्पष्ट केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना