जिल्हास्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेस सुरुवात
अकोला,दि.३ (जिमाका)- अकोला जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त
विद्यमाने आजपासून जिल्हास्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेस सुरुवात झाली आहे.
येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानात आज या स्पर्धेचे मान्यवरांच्या
हस्ते उद्घाटन झाले. येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार असून आज पहिल्याच
दिवशी १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांच्या हॉकी
स्पर्धेत शहरातील हिंगणा रोड येथील स्कुल ऑफ स्कॉलर्स संघाने स्कुल ऑफ स्कॉलर्स
बिर्लाला नमवून विजेतेपद पटकाविले तर जि.एस.कॉन्व्हेट तिसऱ्या स्थानी राहिले. मुलींच्या हॉकी स्पर्धेत मांगीलाल शर्मा
विद्यालय विजयी ठरले असून स्कुल ऑफ स्कॉलर्स हिंगणा रोड उपविजेती ठरली तर पोदार
इंटरनॅशनल स्कुल तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
००००००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा