विशेष संक्षिप्त पुर्ननिरिक्षण कार्यक्रम जाहीर ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती मागविल्या

 

अकोला,दि.३ (जिमाका)- अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्रासह मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरिक्षण कार्यक्रम निर्धारीत केला आहे. या कार्यक्रमानुसार  दि.८ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असल्याचे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.

            भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत जाहीर सर्व विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्रासह मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातही हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधी दरम्यान दुबार नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करण्यासह मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी प्रत्यक्ष भेट देवून तपासणी करण्यात येणार आहे.

                                 ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार

                 अकोला जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ दरम्यान दावे आणि हरकती  स्वीकारण्यात येणार आहे. तर २६ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे आणि हरकती निकाली काढण्यात येणार आहे. तसेच ५ जानेवारी २०२३ पर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील नागरीकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे,नाव वगळणे ईत्यादी करिता मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांच्याकडे आवश्यक अर्ज भरून देण्यात यावे असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत यादीतील दुबार ,स्थलांतरित ,मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. संबंधीतांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे देण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

                                                            ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना