जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे बँक खाते सुरु ; प्राण्यांसाठी सढळ हाताने मदत करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 


अकोला,दि.१७(जिमाका)-: प्राण्यांविषयी कणव बाळगणाऱ्या नागरिकांना आता प्राण्यांच्या कल्याणासाठी चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीने नागरिकांकडून आर्थिक मदत स्वीकारण्यासाठी नवीन बँकखाते उघडले असून नागरिकांनी या खात्यात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्ष निमा अरोरा यांनी केले आहे.

                 प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाला प्रतिबंध घालण्यासाठी व  त्यांना आवश्यक नैसर्गिक परिवेश उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्राणी क्लेष समिती सातत्याने कार्यरत आहे. यात आता सर्वसामान्य नागरिकांनाही आर्थिक सहाय्य करून सहभागी होता येणार आहे. नागरिकांच्या अर्थसहय्यातून समितीच्यावतीने अकोला जिल्ह्यात प्राणी बचाव, पुनर्वसन केंद्र आणि गोशाळा सुरु करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  

बँक खात्याविषयी माहिती

        जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे  सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बँक खाते उघडण्यात आले असून प्राणी प्रेमी नागरिकांना बँक खाते क्र.: 5312894328, आयएफएससी क्र.: CBIN0282333. (सोबत क्यु आर कोड ही दिला आहे.)

तरी नागरिकांनी या बॅंक खात्यात आपल्यावतीने अर्थसहाय्य जमा करावे व प्राणी कल्याणास सहाय्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.   

                                                                 ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ