सैनिकी मुलांच्या वसतीगृहात अधिक्षक पदाकरीता ८ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले


अकोला,दि. ३० (जिमाका)-: शहरातील माजी सैनिकी मुलांच्या वसतीगृहात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रति माह रूपये २९ हजार ८३५ मानधन तत्वावर निव्वळ कंत्राटी पध्दतीने वसतीगृह अधिक्षक पदावर भरतीसाठी  येत्या ८ डिसेंबरपर्यंत आवेदन मागविण्यात येत असल्याचे माजी सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

          वसतीगृह अधिक्षकपदासाठी माजी सैनिक प्रवर्गातून संरक्षण सेवेतील सैन्य दलातील जे.सी.ओ. सुभेदार पदावरील किंवा  त्या पदाच्या समकक्ष नौदल/ वायुदलातील जे.सी.ओ.  अर्ज करू शकतात. वसतीगृह अधिक्षक हे एकच पद भरती करायचे असून यासाठी ६० वर्ष वयाची अट आहे. या पदासाठी  इयत्ता दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता असून  उमेदवार एम.एस.सी.आय.टी  ही संगणक परीक्षा उत्तीर्ण असावा.

            दिनांक ८ डिसेंबर २०२२ पर्यंत इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

                                                                       ००००   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ