कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’ पॉझिटीव्ह; एक डिस्चार्ज तर एकाचा मृत्यू


 अकोला दि.7(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) सहा अहवाल प्राप्त झाले. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. दरम्यान एकाला डिस्चार्ज देण्यात आला तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यूची नोंद झाली, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 0.

आरटीपीसीआर ‘निरंक’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

एकाला डिस्चार्ज

आज दिवसभरात एकाला  डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील 75 वर्षीय महिला असून दि. 6 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 2 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘सात’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65991(49858+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सात सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील एक  रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर सहा जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ