‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धा


अकोला,दि.१ (जिमाका)-  अकोला जिल्ह्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दिनांक १ ते १५ दरम्यान ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

         महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्यावतीने दिनांक १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान राज्यात  सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेंतर्गत शेती व्यवसाय, स्वयंरोजगार,महिला रोजगार, उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अभ्यासक्रमासह अन्य उपयुक्त अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. अकोला जिल्हयातही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून  जास्तीत-जास्त तरुणांनी यात सहभाग  घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जी.व्ही.चोपडे यांनी केले आहे.

                                                                   ००००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना