अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 24 मतदान केंद्रांची वाढ 1500 मतदारांवरील मतदान केंद्राचे विभाजन



अकोला,दि.30(जिमाका)- अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 1500 मतदारांवरील मतदान केंद्राचे विभाजन करण्यात आले असून या मतदार संघात 24 मतदान केंद्राची भर पडल्याने आता येथे 307 मतदान केंद्र निर्माण झाली आहेत. तसेच या मतदार संघातील तीन मतदान केंद्रात बदल करण्‍यात आले आहेत.

दल झालेले मतदार केंद्र

1. मतदान केंद्र क्रमांक दोन- मनपा प्रा.म.मुलांची शाळा क्र. 18 खो.क्र. 4 येथील मतदान केंद्राऐवजी मतदान केंद्र क्रमांक दोन व तीन - स्‍व. एस. एम. डामरे गुरुजी सर्वोदय विद्यालय,अकोला व श्रीमती शांताबाई रामभाऊ चीम सर्वोदय मराठी प्राथ. शाळा, दक्षिणेकडील भाग अकोला येथे.

2. मतदान केंद्र क्रमांक दोन- आयुर्वेदीक भवन मनपा अकोला ऐवजी मतदान केंद्र एक - स्‍व. एस. एम. डामरे गुरुजी सर्वोदय विदयालय, अकोला व श्रीमती शांताबाई रामभाऊ चीम सर्वोदय मराठी प्राथ. शाळा, दक्षिणेकडील भाग अकोला खोली क्र.दोन

3. मतदान केंद्र क्र. 11 ते 15- स्‍व. एस. एम. डामरे गुरुजी सर्वोदय विदयालय, अकोला व श्रीमती शांताबाई रामभाऊ चीम सर्वोदय मराठी प्राथ. शाळा, अकोला ऐवजी  मतदान केंद्र क्र. 16 ते 17 - कुबा उर्दु प्राथमिक शाळा नुर नगर अकोट फैल अकोला येथे राहिल.

   हैदरपुरा खदान या भागातील मतदान केंद्राचे गीता नगर मतदारांकरीता मतदान केंद्र क्रंमांक 253, 255 व 257 असे तिन मतदान केंद्र सेंट अॅन्‍स इंग्‍लीश माध्‍यम शाळा, गिता नगर अकोला याठिकाणी निर्माण करण्‍यात आले आहे.

आगामी काळात होवू घातलेल्‍या महानगरपालिकेच्‍या निवडणुकीकरीता दि. 5 जानेवारी 2023 रोजीच्‍या अर्हता दिनांक ग्राहय धरुन 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरीकांनी आपले नांव मतदार यादीत असल्‍याची खात्री करावी. ज्‍यांचे नांव मतदार यादीत नसेल त्‍यांनी नमुना क्र 6 भरावा तसेच मतदारांना आपले नांव, फोटो, पत्‍ता किंवा इतर काही दुरुस्‍तीकरीता मतदान केंद्रावर जावून मतदान केंद्र अधिकारी यांचेकडे नमुना 8 भरुन द्यावा. मतदार यादीत नांव नोंदणी/वगळणी किंवा दुरुस्‍ती करीता दि. 3 व 4 डिसेंबर 2022 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्‍यात आले असून नागरीकांनी त्‍यांचे जवळील मतदान केंद्रात जावून मतदान केंद्र अधिकारी यांचेशी संपर्क करावा. तसेच मतदारांनी मतदार यादीत समाविष्‍ट/बदल करण्‍याबाबत कार्यवाही विहित मुदतीत करुन घ्यावी. मुदतीनंतर कोणतेही म्‍हणणे ऐकुन घेतले जाणार नाही, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी गजानन सुरंजे यांनी केले आहे.

 

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ