जवळा बु. येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन



अकोला,दि.25 (जिमाका) – वन स्टॉप सेंटर, अकोला यांच्या व्दारे संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना जाणीव जागृती व्हावी याकरीता गुरुवार दि.24 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळा बु. येथे जनजागृती व मार्गदशन शिबीरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक अँड. मनिषा भोरे यांनी संविधान व बाल लैंगिक अत्याचार विषयी मार्गदर्शन केले. तसेच वैद्यकीय सहायक प्रिया इंगळे यांनी आरोग्यविषयी माहिती देऊन स्वच्छतेबाबत बालक व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी वन स्टॉप सेंटरचे आयटी वर्कर अक्षय चतरकर, पंचायत समिती सदस्य मंगला शिरसाट, सरपंच जया चव्हाण व इतर ग्राम पंचायत सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ