कामगार कल्याण मंडळाच्यावतीने आज लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन


अकोला,दि.18(जिमाका)-: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अकोला गट कार्यालयाच्यावतीने शनिवार (दि 19)  रोजी लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

      येथील डाबकी रोड परिसरातील  ‘ललीत कला भवनात’ लोकनृत्य स्पर्धा 2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी सायं. 6 वाजता या स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे.अकोला लायन्स क्लबच्या माजी अध्यक्ष चंदा जयस्वाल, गुणवंत कामगार उमाकांत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत अशी माहिती कामगार कल्याण अधिकारी वैशाली नवघरे यांनी दिली आहे.

                                                              ००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ