कोविडःआरटीपीसीआर चाचण्यात ‘पाच’ पॉझिटिव्ह; दोन डिस्चार्ज

 

अकोला दि.25(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 58 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 5 व खाजगी 0)5+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 5.

आरटीपीसीआर ‘पाच’ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात पाच महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर येथील एक व उर्वरित चार जण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

दोन डिस्चार्ज

आज दिवसभरात दोन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘30’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66050(49917+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 30  सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ