पर्यावरण संरक्षण संवर्धन जनजागृती व कारवाईसाठी संस्था नियुक्त


अकोला,दि.१(जिमाका)-जिल्ह्यात पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करणे, अंमलबजावणी करणे व दंडात्मक कारवाई करण्यासाठी  अनंतनंदाई सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था अकोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा पर्यावरण समितीच्या अध्यक्ष निमा अरोरा यांनी  निर्गमीत  केले  आहेत.

 तसेच जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य सचिव, पशू संवर्धन विभागाचे उपायुक्त  हे  या कारवाईबाबत साप्ताहिक अहवाल सादर करतील. यात संबंधीत क्षेत्रातील तहसिलदार,उपविभागीय अधिकारी,पोलीस निरीक्षकांनी पर्यावरण समितीच्या प्रतिनिधींना सहकार्य करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.  

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ