कोविडःआरटीपीसीआर चाचण्यात ‘एक’ पॉझिटिव्ह; दोन डिस्चार्ज
अकोला दि.24(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे (आरटीपीसीआर) 91 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोन रुग्णास
डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी 0)1+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 1.
आरटीपीसीआर ‘एक’ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
त्यात एक महिलेचा समावेश असून हा रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
दोन डिस्चार्ज
आज दिवसभरात दोन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘27’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66045(49912+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 27 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा