ग्रा.पं. निवडणूक; जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा


 अकोला,दि.१५(जिमाका)- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा देण्यात आली आहे. तरी तहसिलदारांनी ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेकरिता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र स्वीकारून प्राप्त अर्ज जात पडताळणी समितीकडे परस्पर सादर करावे, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. तथापि, उमेदवारांनी  नामनिर्देशनपत्रासह  वैधता प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जांची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याचा पुरावा व निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे हमी पत्र सोबत  द्यावयाचे आहे.

           जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालाधीत मुदत संपणाऱ्या तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात आढळत नसलेल्या  सात तालुक्यांतील २६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यानुसार नामनिर्देशन दाखल करताना उमेदवारांनी  नामनिर्देशनपत्रासह  वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जांची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याचा पुरावा द्यावयाचा आहे. यासोबतच निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्याआत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे हमी पत्र देण्याची मुभाही देण्यात आली आहे.

         जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांस जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करणे सोईचे होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसिलदारांना आदेश दिले आहेत. या आदेशानुसार तहसिलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून  जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज नामनिर्देशन भरण्याच्या दिलेल्या मुदतीच्या अखेरच्या दिवासांपर्यंत स्विकारून प्राप्त झालेला अर्ज सही शिक्क्यानिशी प्रमाणित करून लगेच जात पडताळणी समितीकडे परस्पर सादर करावा, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

                   

                                                                 ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ