अकोला पश्चिम मतदार संघात मतदार नोंदणी विशेष मोहिम


अकोला,दि.18(जिमाका)-: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अद्यावत करण्याकरिता दि. 19 व 20 नोव्हेंबर 2022 तसेच  3 व 4 डिसेंबर 2022 रोजी अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रस्तरावर विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मतदारांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी गजानन सुरंजे यांनी केले आहे.

        या मोहिमेंतर्गत मतदारांनी नाव नोंदणी, मयत, दुबार व स्थलांतर नावे कमी करणे, तसेच मतदारांचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करण्यासह नावातील दुरुस्तीबाबत अर्ज भरुण घेण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होवून सर्व मतदारांनी आपली नावे तपासून मतदार नोंदणी करुन घ्यावी. मतदार यादी दि. 5 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून नवीन नोंदणी व इतर दुरुस्तीबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी गजानन सुरंजे यांनी केले आहे. 

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ