ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक :नियमांचे काटेकोर पालन व्हावे; अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणातून मार्गदर्शन

 







अकोला,दि.१६(जिमाका)-जिल्ह्यातील  सार्वत्रिक निवडणुका होवू घातलेल्या २६६ ग्रामपंचयातींच्या निवडणूक प्रक्रियेसाठी  नियमांचे  काटेकोर पालन करून निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व यशस्वीपणे पार पाडण्याच्या सूचना आज उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  निवडणूक अधिकाऱ्यांच्या  प्रशिक्षण देण्यात आले व निवडणूक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

            ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात   अकोला जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांसाठी निवडणूक कार्यक्रम तयारीची आढावा बैठक व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा सूचना व प्रसारण अधिकारी अनिल चिंचोले आदिंनी मार्गदर्शन केले.

                                तहसिल कार्यालयात तांत्रिक सहायक कक्ष  

           ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी  संगणक प्रणालीद्वारे राबविण्याच्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमात सुसूत्रता राखण्यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात तांत्रिक सहाय्याकरिता मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून तयार करण्याात आलेल्या संकेतस्थळावर संगणक प्रणालीद्वारे माहिती भरता येणार असून याविषयीची माहिती संबंधितांना  पोहचविण्याच्या  सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

             दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्ह्यात सात तालुक्यांतील २६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होताच आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी तहसिल कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करावा आणि यासंदर्भातील माहितीचा नियमीत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावा अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

              या प्रशिक्षणांतर्गत  उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरून घेणे, नामनिर्देशनपत्रांची छाननी, हमी पत्र, जातवैधता प्रमाणपत्र, उमेदवारांकडून घ्यावयाचे एकत्रित स्वयंघोषणा पत्र, आरक्षित  ग्रामपंचायतींच्या माहितींचा तपशिल तयार करणे, आदर्श निवडणूक आचारसंहितेची अंमलबाजवणी करणे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले व शंकाचे निरसन करण्यात आले.नियोजित ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्याचा विश्वासही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

                                                      

                                                                 ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ