लोक अदालतीस प्रारंभ;सिव्हील व क्रिमिनल प्रकरणाचे होणार निपटारा


 अकोला दि.12(जिमाका)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालये येथे आज(दि. 12) राष्ट्रीय लोक अदालतीचे प्रारंभ झाले.  जिल्हा न्यायलय येथे सिव्हील व क्रिमिनलचे 39 हजार 808 प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे, अशी माहिती अशी माहिती जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली आहे.

 जिल्हा न्यायालय येथे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमती सुवर्णा केवले व जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश उपस्थित होते. लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायालयात 29 पॅनलची व्यवस्था करण्यात आली आहे. या पॅनलच्या माध्यमातून सिव्हील व क्रिमिनल प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे. यात निगोशिएबल इन्सट्रुमेन्टस् ॲक्ट च्या कलम -138 खाली दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे , कामगार वाद प्रकरणे, विज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे,  कोर्टात प्रलंबित प्रकरणे तसेच लोक अदालतीच्या मार्फत विधी विषयक सल्ला व मार्गदर्शन मोफत देण्यात येणार आहे.  

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ