खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल


अकोला,दि.11(जिमाका)-  खासदार राहुल गांधी यांची भारतजोडो यात्रा अकोला जिल्ह्यातून जाणार आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने  वाहतूक सुरळीतठेवण्यासाठी भारत जोडा यात्रा मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.  या संदर्भातील आदेश आज  जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

      मालेगाव पासून-मेडशी-पातूर-वाडेगाव-बाळापूर व मालेगाव पासून-पातूर मार्गे-अकोला वाशिम बायपास या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक दि.16 नोव्हेंबर 2022 चे  दुपारी .00 वाजता पासून ते  दि.18 नोव्हेंबर 2022  रोजी दुपारी .00 वाजेपर्यंत  राहील. तसेच, राष्‍ट्रीयमहामार्ग  क्र.06 वरील पारस फाटा ते शेगाव फाटापर्यंतच्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक दि.18 नोव्हेंबर 2022 चे सकाळी 8.00 वाजेपासून ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गाने वळविण्यात आली  असल्याचे आदेशात म्हटले आहे.

­­­­­­­अ. क्र

दिनांक

वेळ

वाहतुक करीता बंद असलेले मार्ग

वाहतुकीस पर्यायी मार्ग

1

दि. 16  ते 17 नोव्हेंबर 2022

दि.16 नोव्हेंबरचे 15.00 वाजता पासून ते दि.17 नोव्हेंबर 2022 चे सकाळी 10.00 वाजे पर्यंत

मालेगाव-मेडशी – पातूर – अकोला राष्‍ट्रीय महामार्ग क्र.161 सर्व प्रकारची वाहतुकीस जाणे- येण्‍यासाठी पुर्णपणे बंद

मालेगाव – शेलुबाजार – महान – बार्शिटाकळी – अकोला राष्‍ट्रीय महामार्ग क्र.06 मार्गे बाळापूर कडे सर्व प्रकारची वाहतुकीस जाणे – येण्‍यासाठी पर्यायी मार्ग

2

दि. 17  ते 18 नोव्हेंबर 2022

दि.17 नोव्हेंबरचे सकाळी 05.00 वाजता पासून ते दि.18 नोव्हेंबर 2022 चे 17.00 वाजेपर्यंत

मालेगाव कडून राष्‍ट्रीय महामार्ग क्र.161 मार्गाने पातूर- वाडेगाव-बाळापूर मार्ग सर्व प्रकारची वाहतुकीस जाणे- येण्‍यासाठी पुर्णपणे बंद

मालेगाव कडून – मेळशी – पातूर – चिखलगाव – कापशी – अकोला – राष्‍ट्रीय महामार्ग क्र.06 मार्गे बाळापूर कडे सर्व प्रकारची वाहतुकीस जाणे – येण्‍यासाठी पर्यायी मार्ग

3

दि. 18 नोव्हेंबर 2022

दि.18 नोव्हेंबर 2022 चे सकाळी 8 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत

राष्‍ट्रीय महामार्ग क्र.06 वरील पारस फाटा – शेगाव नाका

अकोला शेगाव टी पॉईट – गायगाव – उरळ – निंबा फाटा – शेगाव – खामगाव कडे सर्व प्रकारची वाहतुकीस जाणे – येण्‍यासाठी पर्यायी मार्ग

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ