रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः १७८७ चाचण्यात १०१ पॉझिटीव्ह

 अकोला,दि. ९ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.८) दिवसभरात झालेल्या १७८७चाचण्या झाल्या त्यात १०१  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोला येथे ७२ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला,   अकोट येथे ८१ चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे १३६ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे १८० चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे ३० जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  मुर्तिजापूर येथे २०५ चाचण्या झाल्या त्यात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेमार्फत ९७६  चाचण्या झाल्या त्यात ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आय एम ए येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २६ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७१ चाचण्या झाल्या त्यात २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,  असे  एकूण १७८७ चाचण्यात १०१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात ८० हजार १६४ चाचण्या झाल्या पैकी ५९८० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन