रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1595 चाचण्यात 168 पॉझिटीव्ह

 अकोला,दि. 29(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.28) दिवसभरात झालेल्या 1595 चाचण्या झाल्या त्यात 168 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

  काल दिवसभरात अकोट येथे 11 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बाळापूर येथे 26 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बार्शीटाकळी येथे तीन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, पातूर येथे 45 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 58 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 230 चाचण्या झाल्या त्यात 14 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 1021 चाचण्या झाल्या त्यात 77 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 32 चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 23 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 67 चाचण्या झाल्या त्यात 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 67 चाचण्या झाल्या त्यात 29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर बाळापूर येथे 12 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1595 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 168 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 7 हजार 287 चाचण्या झाल्या पैकी 8766 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ