रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1579 चाचण्यात 106 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 3(जिमाका)- कोरोना संसर्ग
चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.1)
दिवसभरात झालेल्या 1579 चाचण्या झाल्या त्यात 106 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,
अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला येथे 122 चाचण्या झाल्या त्यात आठ अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोट
येथे 34 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला,
बाळापूर येथे 33 चाचण्या
झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे आठ चाचण्या
झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 277 चाचण्या
झाल्या त्यात 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला
महानगरपालिकेतून 939 चाचण्या झाल्या त्यात
36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आयएमए येथे 45 चाचण्या
झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातून 78 चाचण्या झाल्या त्यात 21 जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आले, तर बार्शीटाकळी येथे
दोन, तेल्हारा येथे 12, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 29 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे एकूण 1579 चाचण्यात 106 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 69 हजार 129 चाचण्या झाल्या पैकी 5373 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा