१७५३ अहवाल प्राप्त, १७२ पॉझिटीव्ह, ३१९ डिस्चार्ज,आठ जणांचा मृत्यू
अकोला,दि.७(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १७५३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १५८१ अहवाल निगेटीव्ह तर १७२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान ३१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर आठ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.६) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये ९१ जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २९५५८(२३६९३+५६८८+१७७)
झाली आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आजचे एकुण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (सकाळ)-१११+आरटीपीसीआर(सायंकाळ)-६१+ रॅपिड
ॲन्टिजेन टेस्ट-९१= २६३ एकुण
पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १६५१८५ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १६२५३१ फेरतपासणीचे ३७९ तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे २२७५ नमुने होते. आजपर्यंत एकूण १६५०८३ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह
अहवालांची संख्या १४१३९० आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
१७२
पॉझिटिव्ह
आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोग शाळेतून प्राप्त अहवालांनुसार १७२ जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आले. त्यात सकाळी १११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ३६ महिला तर ७५
पुरुष आहेत. त्यातील कौलखेड व मोठी उमरी येथील नऊ, पारस येथील सहा, खडकी येथील
चार, खोलेश्वर, गोरक्षण रोड, शास्त्री
नगर, लहान उमरी येथील प्रत्येकी तीन,
तेल्हारा, सिंधी कॅम्प, मित्र नगर, जीएमसी, रतनलाल प्लॉट, राऊत वाडी, गांधी रोड, पैलपाडा आणि बाभुळगाव
येथील प्रत्येकी दोन, उर्वरीत अंदुरा,
दहिगाव ता. तेल्हारा, गाडेगाव, दापुरा, हिवरखेड,
सौंदळा, अकोट, रामदास पेठ, शिवर,
खरप, चौरे प्लॉट, शंकर नगर,
तुकाराम चौक, कीर्तीनगर, हिंगणा फाटा, सुधीर कॉलनी, हातरुण, सस्ती, उमरी,
व्हीएचबी कॉलनी, रामनगर, गोडबोले प्लॉट, डाबकी रोड, कलाल ची चाळ, जयहिंद चौक, दगडी
पूल, देवराव बाबाची चाळ, राजंदा, तारफैल,
बापू नगर, शेळद, गोकुळ कॉलनी, जठारपेठ,
बोरगाव मंजू, न्यू तापडीया नगर, महसूल कॉलनी, दहातोंडा, गाडगे नगर, हिंगणा रोड,
शिवसेना वसाहत, सावरगाव, देऊळगाव, पातूर,
माळराजूरा, आगीखेड, चैतन्य नगर, सिंदखेड, बाळापूर, आझाद कॉलनी, राजनखेड,
बार्शी टाकळी, उरळ आणि माळीपुरा येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. तर
आज सायंकाळी ६१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २६ महिला व ३५ पुरुषांचा समावेश
आहे. त्यात अकोट येथील १४, मुर्तिजापूर येथील नऊ, साहित येथील तीन, रणपिसेनगर,
केशव नगर आणि नर्सिंग होस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरीत जवाहर नगर,
गितानगर, आदर्श कॉलनी, डाबकी रोड, बार्शी टाकळी, कान्हेरी सरप, मलकापूर, जांभळून,
महान, जमकेश्वर, तेल्हारा, शिरसोली,
मिर्जापूर, दताळा, शेरवाडी, तपे हनुमान नगर, जुने शहर, देशमुख फाईल, जीएमसी, मोठी
उमरी, विझोरा, मराठा नगर, दिवेकर आखाडा, माळीपुरा, राहित, हाता, खडकी, शिरसगाव आणि
अकोट फाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल (दि.६)
रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या
अहवालात ९१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल
संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
आठ
जणांचा मृत्यू
दरम्यान आज दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात सकाळी सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात-खदान
येथील ६० वर्षीय महिलाअसून या महिलेस दि.२२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. कुणबीपुरा सिंदखेड ता. बार्शी टाकळी येथील ५९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.६ रोजी
दाखल केले होते. पारस येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.४ रोजी दाखल
करण्यात आले होते. जुने शहर भागातील ५४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.४ रोजी दाखल करण्यात आले होते.तुकाराम
चौकातील ७२ वर्षीय पुरुष असून त्यांना आजच
मृतावस्थेत दाखल केले होते. रणपिसेनगर येथील ६४ वर्षीय महिला असून या महिलेस दि.२
रोजी दाखल केले होते. तर आज सायंकाळी खाजगी रुग्णालयातील दोन रुग्णांचा मृत्यू
झाला. त्यात खोलेश्वर येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे तर अन्य रुग्ण
नकाशी ता. बाळापूर येथील ७० वर्षीय महिला रुग्ण आहे. या रुग्णास दि.४ रोजी दाखल
करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
३१९
जणांचा डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४२, आयकॉन हॉस्पिटल-दोन, हार्मोनि हॉस्पिटल- तीन,
क्रिस्टल हॉस्पिटल-पाच, बिहाडे हॉस्पिटल-११, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापुर-तीन,
अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल-तीन, हॉटेल स्कायलार्क- दोन, समाजकल्याण वसतीगृह-१८, बार्शी टाकळी कोविड केअर सेंटर-दोन, नवजीवन
हॉस्पिटल-दोन, हॉटेल रिजेन्सी-चार, सुर्यचंद्र हॉस्पिटल-तीन, बाळापूर कोविड केअर
सेंटर-दोन, ओझोन हॉस्पिटल-चार तर होम आयसोलेशन मधील २१३ असे एकूण ३१९ जणांना
डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती
जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
३७६३
जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २९५५८(२३६९३+५६८८+१७७)
आहे. त्यात ४८६ मृत झाले
आहेत. तर २५३०९ जणांना डिस्चार्ज देण्यात
आला असून सद्यस्थितीत ३७६३ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा