1222 अहवाल प्राप्त, 231 पॉझिटीव्ह, 330 डिस्चार्ज, 12 मृत्यू

 


अकोला,दि.13(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1222 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 991 अहवाल निगेटीव्ह तर 231 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 330  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 12  जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 137 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 31394(24895+6322+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आजचे एकुण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर(सकाळ)-137+आरटीपीसीआर (सायंकाळ)-94+रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट -137= 368, एकुण पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 174441 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 171754 फेरतपासणीचे 383 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2304 नमुने होते. आजपर्यंत एकूण 174351 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 149456  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

231 पॉझिटिव्ह

आज सकाळी १३७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४६ महिला व ९१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अमाखाँ प्लॉट व मोठी उमरी येथील प्रत्येकी नऊ, कौलखेड, खडकी, गोरक्षण रोड, गीता नगर, पारस कॉलनी व मलकापूर येथील प्रत्येकी पाच, जीएमसी, बार्शीटाकळी, राम नगर व तोष्णीवाल लेआऊट येथील प्रत्येकी चार, पिंजर, कोलोरी, रणपिसे नगर व राऊतवाडी येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, बोरगाव मंजू, बाळापूर,  अकोट, ख्रिरपूर, शिवार, जठारपेठ, देवकी नगर व हरिहर पेठ येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित हिंगणा, गोकूल कॉलनी, न्यू बस स्टँड, लक्ष्मी नगर, गड्डम प्लॉट, वनीरंभापूर, देशमुख फैल, सोपीनाथ नगर, शिवाजी नगर, पार्वती नगर, निंभोरा,पैलपाडा, देगाव, दहिहांडा, तेल्हारा, पातूर, मांडोली, कंळबा ता.बाळापूर, हसनापूर, गोकूल कॉलनी, खामखेड, पारस, शेलद, राजीव गांधी नगर, रिंग रोड, दानोरी ता.अकोट, राधेनगर, गौतम रोड, सिंधी कॅम्प, रतनलाल प्लॉट, लहान उमरी, तेल्हारा, जवाहर नगर, व्याळा ता.बाळापूर, वर्धमान नगर, मातानगर, शिवनी, महाकाली नगर, शिवसेना वसाहत, गोपालखेड, वाडेगाव, रामदासपेठ व विराहित येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ९४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात ३४ महिला व ६० पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुर्तिजापूर येथील ११, बार्शीटाकळी येथील नऊ, कौलखेड येथील सात, मलकापूर येथील पाच, खडकी येथील चार, राऊतवाडी, मोठी उमरी व पिंजर येथील प्रत्येकी तीन, बहादुरा, रामदासपेठ, डाबकी रोड, जवाहर नगर, बलवंत कॉलनी, खदान व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित नया अंदुरा, खेडकर नगर, आपातापा रोड, निबंधे प्लॉट, जपान जीन, अनिकट, अगरबेस, मालीपुरा, तार फैल, रिंगल टॉकीज, अंबिका नगर, जूने शहर, विजय नगर, सिंधी  कॅम्प, तेल्हारा, निमवाडी, रिंग रोड, लेडी हार्डीग रोड, पिकेव्ही, शिवार, आरटीओ रोड, हरिहर पेठ, लक्ष्मी नगर, कच्ची खोली, किर्ती नगर, गिरी नगर, नर्सीग हॉस्टेल, तरोडी, जीएमसी, आळशी प्लॉट, रतनलाल प्लॉट, हिंगणा फाटा, नफेवाडी, वाडेगाव ता.बाळापूर व धानेगाव ता.बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल (दि.12) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 137 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवालात करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

12 जणांचा मृत्यू

दरम्यान आज 12 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात हमझा प्लॉट, जूने शहर येथील ४४ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ७ रोजी दाखल केले होते. तर अन्य नायगाव येथील ४० वर्षीय महिला असून या महिलेस दि. ११ रोजी दाखल केले होते, आळसी प्लॉट येथील ६५ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ११ रोजी दाखल केले होते.  तर ४२ वर्षीय पारस येथील पुरुष असून  या रुग्णास दि. ६ रोजी दाखल केले होते. अन्य रुग्ण शास्त्री नगर येथील ८१ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. १० रोजी दाखल केले होते, भरतपूर ता.बाळापूर येथील ७४ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. १२ रोजी दाखल केले होते, शिवसेना वसाहत येथील ५८ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. ८ रोजी दाखल केले होते, खदान येथील ७४ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. ८ रोजी दाखल केले होते. तर दगडीपारा येथील ३६ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ११ रोजी मृतावस्थेत दाखल केले होते.  तसेच आज सायंकाळी खाजगी रुग्णालयातून तिघांचा मृत्यूची नोंद झाली. त्यात मुर्तिजापूर येथील ८० वर्षीय पुरुष असून त्यांना दि. २ रोजी दाखल केले होते. तर अन्य तेल्हारा येथील ५५ वर्षीय महिला असून  या रुग्णास दि. २ रोजी दाखल केले होते. तसेच कोठारी वाटीका नं.८ येथील ४५ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ११ रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

330  जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५२, देवसार हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील एक, याक्विन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, हैदर उम्मत हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील १०, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, युनिक हॉस्पीटल येथील एक, बाईज हॉस्टेल दोन, आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील चार, तर होम आयसोलेशन येथील २२८, असे एकूण ३३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

3773 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 31394(24895+6322+177) आहे. त्यात 528 मृत झाले आहेत. तर 27093 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 3773  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ