कोविड लस घेणाऱ्या ग्राहकांच्या ठेवीवर जादा व्याजदर - सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाची ‘इम्युन इंडिया डिपॉजीट योजना’

 अकोला,दि. १५(जिमाका)-  कोविड लसीकरण अभियानास चालना देण्यासाठी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया च्या वतीने कोविड लसीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी ‘इम्युन इंडिया डिपॉजीट योजना’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत कोविड लसीकरण करणाऱ्या खातेदाराच्या ठेवींवर ०.२५ टक्के जादा व्याजदर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तेरानिया यांनी दिली. यासाठी ११११ दिवसांसाठी ‘इम्युन इंडिया डिपॉजीट योजना’ अंतर्गत ठेव ठेवण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेत सहभागी होणारे ज्येष्ठ नागरिक अतिरिक्त व्याजदराचा लाभ मिळण्यासही पात्र असतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ