'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंध 15 मेपर्यंत कायम

           

            अकोला,दि. 30(जिमाका)-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता व संसर्गाची साखळी तोडण्याच्यादृष्टीने 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आले होते.  ‘ब्रेक द चेन’  अंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता दि. 15 मेचे सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन कालावधी वाढविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदेश निर्गमित केले. 

      1. मद्यविक्री- जिल्‍हयातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्‍ये  मद्यविक्री संदर्भाने  निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आदेशानुसार   अंशतः बदल करुन  पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्‍यात येत आहेत.

 

अक्र

तपशिल

कालावधी

मद्य विक्री नमूना FL-2 ,FL/BR-II, Form E, Form E-2  FLW-2 या अनुज्ञप्‍तीतून घरपोच या प्रकाराने मद्य विक्री करता येईल. नमूना CL-3  अनुज्ञप्‍तीतून फक्‍त सीलबंद बाटलीतून घरपोच य प्रकारानेमद्यविक्री करता येईल.

सकाळी ७.०० ते रात्री ८.००

कोणत्‍याही परिस्थितीत मद्य विक्रीची दुकाने उघडून Take away किंवा पार्सल पध्‍दतीने  दुकानातून ग्राहकास विक्री करता येणार नाही.  ग्राहकास मद्य विक्रीच्‍या दुकानास भेट देता येणार नाही.(अधीक्षक, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क अकोला यांनी SOP  नुसार आवश्‍यक तपासणी करावी. )

 

         2. पेट्रोल पंप - पेट्रोल पंपासंदर्भा निर्गमित करण्‍यात आलेले आदेशानुसार दि. 15 मेचे सकाळी सातवाजेपर्यंत कायम ठेवण्‍यात येत असून महाराष्‍ट्र राज्‍य औद्योगीक विकास महामंडळ क्षेत्रातील (M.I.D.C.) पेट्रोल, डीझेल पंप यांना सकाळी 8 ते 11 व   सकाळी 11  ते रात्री 8.00 या कालावधीत केवळ अत्‍यावश्‍यक सेवेकरिता सुरु ठेवण्‍याबाबत परवानगी  देण्‍यात येत आहे.

            3. शेतीविषयक सेवा ( कृषि सेवा केन्‍द्र / दुकाने, बि-बियाणे /रासायनिक खते / किटकनाशके ई दुकाने सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु ठेवण्‍याबाबत परवानगी देण्‍यात येत आहे. (या बाबत जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी अकोला यांनी आवश्‍यक तपासण्‍या कराव्‍यात)

                         

            आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी जिल्‍हा पोलीस अधीक्षक अकोला, मनपाचे आयुक्‍त, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी करावी, असे आदेशात नमूद केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ