रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 2126 चाचण्यात 201 पॉझिटीव्ह

 


 अकोला,दि. 20(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.19) दिवसभरात झालेल्या 2126 चाचण्या झाल्या त्यात 201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

  काल दिवसभरात अकोट येथे 137 चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. बाळापूर येथे 56 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. बार्शीटाकळी येथे 129 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. पातूर येथे 73 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तेल्हारा येथे 68 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. मुर्तिजापूर येथे 271 चाचण्या झाल्या त्यात 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोला मनपा तर्फे 1161 चाचण्या झाल्या त्यात 75 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोला आयएमए येथे 33 चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 108 चाचण्या झाल्या त्यात 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर हेडगेवार लॅब येथे 64 चाचण्या झाल्या त्यात 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर  अकोला येथे सहा, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 20 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. असे 2126 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 201 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.आतापर्यंत जिल्ह्यात 95 हजार 933 चाचण्या झाल्या पैकी 7468 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ