१३९१ अहवाल प्राप्त, १९० पॉझिटीव्ह, ३७६ डिस्चार्ज, सात मृत्यू

 अकोला,दि.१० (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १३९१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १२०१ अहवाल निगेटीव्ह तर १९०  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान ३७६ जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर सात  जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.९) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये ११०   जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३०४२८(२४२४०+६०११+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आजचे एकुण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (सकाळ)-१७०+आरटीपीसीआर(सायंकाळ)-२०+ रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट-११०= ३००, एकुण पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १७०४५१ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १६७७८२  फेरतपासणीचे ३८२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २२८७ नमुने होते. आजपर्यंत एकूण १७०१७९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १४५९३९ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

१९० पॉझिटिव्ह

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून १९० जणांचे पॉझिटीव्ह अहवाल आले. त्यात सकाळी १७० जणांचे पॉझिटीव्ह अहवाल आले. त्यात ६१ महिला व १०९ पुरुषांचा समावेश आहे. त्यात कौलखेड येथील ११, मोठी उमरी व तेल्हारा येथील आठ, डाबकी रोड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी सात, पारस, मलकापूर,  शास्त्री नगर, आळशी प्लॉट येथील प्रत्येकी पाच,  तापडीया नगर येथिल प्रत्येकी चार, जीएमसी, केशव नगर, बाभुळगाव, जठारपेठ,  गितानगर येथील प्रत्येकी तीन, तर आपातापा रोड, पातूर, डोंगरगाव, जुनेशहर,  बाळापुर,  चांदूर,  शिवनी, गोरक्षण रोड,  बार्शी टाकळी,  गिरीनगर, खडकी, रामदास पेठ,  सुधीर कॉलनी, रघुनंदन सोसायटी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत पिंपळ खुटा,  पिंजर, मोहराळ, साल्पि, वाल्पि,  वाघजाळी, मनुताई कन्या विद्यालय,  म्हैसपूर,  आदर्श कॉलनी,  दापुरा ता. तेल्हारा,  कापशी तलाव,  कान्हेरी गवळी,  शिवसेना वसाहत,  शिवर,  लहान उमरी,  उगवा, गंगानगर,  दानोरी,  हाजी नगर,  रामनगर, बोरगाव, कन्हेरी,  हरिहरपेठ, रिधोरा,  वाडेगाव,  शेलार फाईल,  अनिकट,  शिवनगर,  विजय नगर, रचना कॉलनी, कोळवई,  बंजारा नगर,  रमेशपूर,  निमवाडी,  वाशीम बायपास,  श्रावगी प्लॉट,  भरतपूर,  कीर्तीनगर,  सहकार नगर,  कामा प्लॉट,  रतनलाल प्लॉट,  गजान नगर,  वाडेगाव, बालाजीनगर,  शिवनी खदान,  उमरी,  गुडधी, शेलाड ता. बालापुर,  तोष्णिवाल लेआऊट,  रणपिसेनगर,  कृषीनगर,  जवाहरनगर,  दुर्गा चौक, गोकुळ कॉलनी,  विजय नगर, बोरगाव मंजू,  अकोट फाईल,  सोनाळा व नायगाव येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी २० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात आठ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील  कौलखेड येथील तीन, डाबकी रोड, गितानगर, केशव नगर व जीएमसी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत  कन्हेरी गवळी, गोरक्षण रोड. वरखेड ता. बार्शी टाकळी, तुकाराम चौक,  अशोक नगर,  मलकापूर, सिव्हील लाईन, तेल्हारा आणि शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

दरम्यान काल (दि.९)रात्री  रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट चा अहवाल प्राप्त झाला. त्यात ११० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

सात जणांचा मृत्यू

आज दिवसभरात सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात  डाबकी रोड येथील ३५ वर्षीय पुरुष, या रुग्णास दि.१ रोजी दाखल करण्यात आले होते. डाबकी रोड येथील ६५ वर्षीय महिला या महिलेस दि.९ रोजी दाखल करण्यात आले होते. पोळा चौक येथील ५२ वर्षीय पुरुष या रुग्णास दि.६ रोजी दाखल केले होते. माळीपुरा येथील ६५ वर्षीय पुरुष या रुग्णास दि.६ रोजी दाखल करण्यात आले होते. तर डाबकी रोड येथील ५३ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.९ रोजी मृतावस्थेत दाखल केले  होते. सायंकाळी प्राप्त माहितीनुसार, खाजगी रुग्णालयात  दोघांचा मृत्यू झाला. त्यात खोलेश्वर येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य रुग्ण ७५ वर्षीय माजरी ता. बाळापूर येथील पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.६ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

३७६ जणांना डिस्चार्ज

दरम्यान दुपारनंतर उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून सात, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून आठ, आधार हॉस्पिटल मुर्तिजापुर येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून  चार,  नवजीवन हॉस्पिटल येथून दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून तीन, अवघाते हॉस्पिटल मुर्तिजापुर येथून  एक, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून  चार, समाजकल्याण मुलांचे वसतीगृह येथुन तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथून चार, देवसर हॉस्पिटल येथून पाच, युनिक हॉस्पिटल येथून एक तर होम आयसोलेशन मधील २८९ व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३१ असे एकूण ३७६ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

३७३८ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३०४२८(२४२४०+६०११+१७७) आहे. त्यात ४९९ मृत झाले आहेत. तर २६१९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३७३८ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ