उद्योग व आस्थापनाधारकांनी स्वत:ची व कामगारांची काळजी घ्यावी

 अकोला,दि. ६ (जिमाका)-  कोरोना काळात ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांचे सर्व संबंधित आस्थापनांनी पालन करावे. तसेच सर्व संबंधित आस्थापना व त्यावरील कामगारांनी या काळात स्वतःची व आपल्या कामगारांची काळजी घ्यावी असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त राजु गुल्हाने यांनी केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कीकोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत कडक निर्बंध लावण्याचे आदेश निर्गमित केले आहे.अकोला जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशनुसार सर्व दुकाने / बाजारपेठ / सिनेमा हॉल, रेस्टॉरन्ट, हॉटेल्स, उपहारगृह, बार तसेच मॉल्स मधील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून इतर सर्व प्रकारचे दुकाने बंद राहतील.          तसेच बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशाच ठिकाणी बांधकामे सुरु राहतील. बांधकाम साहीत्याची ने आण  करण्याची मुभा राहील. या सर्व आस्थापनांमध्ये काम करणारे सर्व कामगार कर्मचारी / मालक / चालक यांनी भारत सरकार यांचे निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड लसीकरण करुन घेतलेल्या व्यक्तींनी 15 दिवस वैधता असलेले कोविड-19- RTPCR चाचणी  निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील. या आदेशांचे कारखाने उत्पादन करणारे आस्थापना मालक यांनी काटेकोर पालन करावे. तसेच उद्योगातील अथवा बांधकामाच्या ठिकाणी कोणताही कामगार कोविड- 19 बाधित असल्याचे आढळुन आल्यास, अशा कामगारांना वैद्यकिय रजा देऊन Quarantine करण्यात यावे त्याला कामावरुन कमी करता तसेच त्याचे वेतन कपात करता नियमानुसार वेतन अदा करावे.याबाबत कामगार/मालक यांना काही समस्या असल्यास, सहाय्यक कामगार आयुक्त, अकोला यांचे कार्यालय, गोरक्षण रोड, अकोला च्या 0724-2459289 0724-2950466 या दुरध्वनी क्रमांकावर  संपर्क  करावा असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, राजु दे. गुल्हाने यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना