2128 अहवाल प्राप्त, 383 पॉझिटीव्ह, 304 डिस्चार्ज, आठ मृत्यू

अकोला,दि.23(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2128 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1745  अहवाल निगेटीव्ह तर 383 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 304 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर आठ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.22) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 181 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 36709(28619+7913+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 383 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 181 असे एकूण पॉझिटीव्ह 564 आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 192389  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 189566 फेरतपासणीचे 385 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2438   नमुने होते. आजपर्यंत एकूण 192312 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 163693 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

383 पॉझिटिव्ह

 आज  दिवसभरात ३८३ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४३ महिला व २४० पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-२९, अकोट-५४, बाळापूर-२९, तेल्हारा-११, बार्शी टाकळी-१८, पातूर-२०, अकोला-२२२. (अकोला ग्रामीण-३८, अकोला मनपा क्षेत्र-१८४)

दरम्यान काल (दि. 22) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात  181 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

आठ जणांचा मृत्यू

आज दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात टाकळी खु., अकोट येथील ३५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १४ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य काजळेश्वर ता.बार्शीटाकळी येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते, भवानी पेठ येथील ५१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, अशोक नगर ता.अकोट येथील ५३ वर्षीय महिला असून या महिलेस दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, तर जूने शहर येथील २४ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, कौलखेड येथील ७१ वर्षीय  पुरुष असून या रुग्णास दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते.  जूने शहर येथील ५५ वर्षीय महिला रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते. तर एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण सिव्हील लाईन येथील ७० वर्षीय महिला असून त्यांना दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

304  जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, आधार हॉस्पीटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील सहा, उषा मल्टीस्पेशेलीटी येथील एक, एच एस पाटील हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील आठ, यकीन उन्नती हॉस्पीटल येथील येथील पाच, कोविड केअर सेंटर अकोट येथील आठ, नवजीवन हॉस्पीटल येथील दोन, हारमोनी हॉस्पीटल येथील चार, इंदिरा हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील एक, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, आरकेटी महाविद्यालय येथील दहा, समाज कल्याण हॉस्टेल येथील आठ, तर होम आयसोलेशन मधील १८७ असे एकूण ३०४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6422  जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 36709(28619+7913+177) आहे. त्यात 610 मृत झाले आहेत. तर 29677 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6422 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ