पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हादौरा

 अकोला, दि.३० (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शनिवार दि.१ मे रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. 

त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि.१  मे रोजी सकाळी ७ वा ५५ मि. नी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन, सकाळी आठ वा. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती, स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात, सकाळी साडे आठ वा. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक, स्थळ- लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,  सकाळी सव्वा नऊ वा. डॉ. पंजाबराव देशमुख  कृषी विद्यापीठ येथील कोविड हॉस्पिटलची पाहणी,  सकाळी सव्वा दहा वा.  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोविड लसीकरण केंद्रास भेट, सकाळी ११ वा. शहरातील प्रतिबंधात्मक केंद्रांना भेटी, सकाळी साडेअकरा वा.  शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव नंतर सोईने  कुरळपूर्णा जि. अमरावतीकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ