रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1451 चाचण्यात 84 पॉझिटीव्ह

 


          अकोला,दि. 5(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.4) दिवसभरात झालेल्या 1451 चाचण्या झाल्या त्यात 84  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोला येथे 135 चाचण्या झाल्या त्यात तीन अहवाल पॉझिटिव्ह आला,   अकोट येथे 262 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे 29 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला,  बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे 19 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 106 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेतून 812  चाचण्या झाल्या त्यात 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 14 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 66 चाचण्या झाल्या त्यात 24  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर तेल्हारा येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,  असे  एकूण 1451 चाचण्यात 84 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 72 हजार 257 चाचण्या झाल्या पैकी 5562 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना