शहरात भव्य शहीद स्मारक उभारणार- पालकमंत्री बच्चू कडू

 




अकोला,दि.22 (जिमाका) - देशासाठी बलीदान दिलेल्या जिल्ह्यातील विरपुत्राचे स्मरणार्थ शहरात भव्य शहीद स्मारक उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकर, उपजिल्हाधिकारी महसूल गजानन सुरंजे  यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील 24 शहीदाचे सतत स्मरण व प्रेरणा मिळावी यासाठी शहरातील नेहरु पार्क जवळील शहिद स्मारकांचे नुतनीकरण करुन शहीदाचे पुतळे  त्याच्या कार्याच्या माहितीसह उभारण्यात येणार आहे. याठिकाणी  दोन फवारे तसेच पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी सेल्फी पाईंटसुध्दा तयार करण्यात येणार आहे. स्मारकाच्या ठिकाणी उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. तसेच अग्रस्थानी रणगाडा ठेवण्यात येणार आहे. यासाठी करण्यात आलेले नियोजनाचे सादरीकरण पालकमंत्री याना दाखविण्यात आले. त्यावेळी त्यांनी त्यात काहि बदल करण्याचे सूचविले.

ग्रामपंचायत भवनाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी आवश्यक सोईसुविधा झेरॉक्स, ई-सुविधा, तलाठी कार्यालय, कृषि केंद्र व कार्यालय अशा सुविधा एकाच ठिकाणी तयार करण्याबाबतचे नकाशाव्दारे सादरीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी पालकमंत्री यांच्यासमक्ष सादर केले. आवश्यक त्या सूचना देवून प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश पालकमंत्री ना. कडू यांनी दिले. तसेच  स्थानिक स्त्री रुग्णालयात सोईसुविधायुक्त आधुनिक रुग्णालय तयार करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश पालकमंत्री यांनी दिले. तसेच यावेळी झुमव्दारे उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्याशी पाणंद रस्ते विकास आराखडाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ