रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः १५४७ चाचण्यात १४४ पॉझिटीव्ह

  अकोला,दि. १६(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.१५) दिवसभरात झालेल्या १५४७ चाचण्या झाल्या त्यात १४४  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

  काल दिवसभरात अकोला येथे १०२ चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोट येथे  ८० चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. बाळापूर येथे  ६४ चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. बार्शीटाकळी येथे  तीन चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. पातूर येथे ११ चाचण्या झाल्या त्यात  दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तेल्हारा येथे ३४ चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. मुर्तिजापूर येथे  २६३ चाचण्या झाल्या त्यात २४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोला मनपा तर्फे ८४० चाचण्या झाल्या त्यात  ४९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोला आयएमए तर्फे २२ चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ३१ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६४ चाचण्या झाल्या त्यात १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर हेडगेवार लॅब येथे ३३ चाचण्या झाल्या त्यात १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. असे १५४७ जणांच्या चाचण्या होऊन त्यात १४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.आतापर्यंत जिल्ह्यात ८९ हजार चाचण्या झाल्या पैकी ६७५८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ