रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 825 चाचण्यात 94 पॉझिटीव्ह

 


          अकोला,दि. 12(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.11) दिवसभरात झालेल्या 825 चाचण्या झाल्या त्यात 94  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे 35 चाचण्या झाल्या त्यात 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेतून 620  चाचण्या झाल्या त्यात 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आयएमए येथे पाच चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 93 चाचण्या झाल्या त्यात 35  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, हेगडेवार लॅब येथे चार चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर बाळापूर येथे 49, बार्शीटाकळी येथे एक,  व जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 18 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,  असे  एकूण 825 चाचण्यात 94 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 83 हजार 427 चाचण्या झाल्या पैकी 6264 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ